इंफाळ – मागील काही मासांपासून मणीपूरमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार चालू आहे. हा हिंसाचार करणार्या आतंकवाद्यांकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे ही चिनी बनावटीची आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणारे बहुतांश आतंकवादी हे बंदुका आणि रायफली यांचा वापर करत आहेत. चीन-म्यानमार सीमारेषेवर शस्त्रास्त्रांचा काळा बाजार भरतो. येथून ही शस्त्रास्त्रे म्यानमार सीमेवर आणून तेथून मणीपूर राज्यात पाठवली जातात, अशी माहिती झी वृत्तवाहिनीने दिली आहे.
सौजन्य: Zee News
भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणार्या आतंकवादी संघटनांना चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे पुरवली जातात. मणीपूरमध्ये हिंसाचार घडवणार्या अनेक आतंकवादी संघटनांचे प्रमुख हे चीनमध्ये लपून बसल्याची माहितीही समोर आली आहे.
संपादकीय भूमिकापूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणार्या आतंकवादी संघटनांना चीन फूस लावत असल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर भारतातील नक्षलवाद्यांनाही चीन साहाय्य करतो. असे असतांना भारत चीनच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलत आहे ? |