छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

जिजाऊं

देशाची आजची स्‍थिती मध्‍ययुगीन काळात राजमाता जिजाऊंच्‍या बालपणी जशी होती, तशी आहे. आम्‍ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो; परंतु त्‍यांना कुणी घडवले, याचा मात्र विचार करत नाही. संस्‍कृती आणि संस्‍कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊंनीच आपल्‍याला शिकवले आहे. त्‍या काळात सर्वच पुरुष मुसलमानांच्‍या सैन्‍यात नोकरी करत होते. हिंदु लढत आणि विजय मुसलमानांचा होत असे. जिजाऊंनी हे सर्व हेरले आणि त्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायला आरंभ केला. त्‍यांनी राजांना ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि वैदिक धर्माचे ज्ञान दिले. त्‍यामुळेच राजांमध्‍ये राज्‍यरक्षणासह धर्मरक्षणही करण्‍याची क्षमता निर्माण झाली. आज आपल्‍याला जिजाऊंसारखी माता हवी !

– श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश