पुणे येथील उच्‍चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणारे ‘ड्रग्‍ज’चे रॅकेट उघडकीस !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – संभाजीनगर पोलिसांनी उच्‍चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणारे अमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. संभाजीनगर पोलिसांनी पुंडलिकनगर भागात ४ ठिकाणी धाडी टाकल्‍या आहेत. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन किलो गांजा, एम्.डी., चरस असा अमली पदार्थांचा साठा जप्‍त केला आहे. पुणे येथे शिकणारी मुले संभाजीनगरहून ‘ड्रग्‍ज’ घेऊन जायची आणि मित्रांसह ‘ड्रग्‍ज पार्ट्या’ करायची, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा पार्ट्यांचे व्‍हिडिओ पोलिसांच्‍या हाती लागल्‍यानंतर ही धडक कारवाई करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका :

आतंकवादी सापडणे, ‘ड्रग्‍ज’चे रॅकेट उघड होणे यावरून ‘असुरक्षित पुणे’ अशी पुण्‍याची प्रतिमा होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करणे आवश्‍यक !