नवी देहली – कोळसा घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना १३ जुलै या दिवशी दोषी ठरवण्यात आले होते. आता त्यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देहलीतील विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. काँग्रेस सत्तेवर असतांना वर्ष २०१२ मध्ये कोळसा घोटाळा बाहेर आला होता.
कोयला घोटाले में पूर्व सांसद विजय दर्डा और उनके बेटे को 4 साल की सजा, 15 लाख का जुर्माना#VijayDarda #CoalScam #LatestNews https://t.co/YbZ8Ie05kV
— DNA Hindi (@DnaHindi) July 26, 2023
अन्य दोषींमध्ये कोळसा विभागाचे तत्कालीन सचिव एच्.सी. गुप्ता, के.एस्. क्रोफा आणि के.सी. सामरिया, ‘जे.एल्.डी. यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि त्याचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात कोळसा विभागाच्या तीनही अधिकार्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून यवतमाळच्या आस्थापनाला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
महालेखापरीणकांच्या मते हा घोटाळा १० लाख कोटी रुपयांचा होता. या घोटाळ्याच्या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना शिक्षा झाली आहे. दर्डा यांनी अवैधपणे कोळसा खाणीचे कंत्राट मिळवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिका
|