इचलकरंजीत (जिल्‍हा कोल्‍हापूर) गोल टोपी घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यांना हिंदु विद्यार्थ्‍यांकडून भगवी टोपी घालून प्रत्‍युत्तर !

असे हिंदु धर्मप्रेमी विद्यार्थी हेच इतरांसाठी आदर्श आहेत !

महाविद्यालयात जाण्‍यासाठी भगवी टोपी आणि भगवी गळपट्टी घालून थांबलेले विद्यार्थी

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – इचलकरंजी शहरातील एका महाविद्यालयात २१ जुलैला धार्मिक पोषाखावरून झालेल्‍या प्रकरणाविषयी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने बैठक बोलावण्‍यात आली होती. या बैठकीत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या पदाधिकार्‍यांनी ‘महाविद्यालयात शाळेचाच पोषाख असावा. त्‍यात धार्मिक रंग नको’, असे आवाहन केल्‍यानंतरही शहरातील मुसलमान धर्मांतील ज्‍येष्‍ठ लोकांनी या बैठकीत मुसलमान विद्यार्थी महाविद्यालयात गोल टोपी घालून येणारच’, असे सांगितले. यानंतर २५ जुलैला हे विद्यार्थी महाविद्यालयात गोल टोपी घालून आले. याला हिंदु विद्यार्थ्‍यांनी जोरदार प्रत्‍युत्तर देत भगवी टोपी आणि गळ्‍यात भगवी पट्टी घालूनच महाविद्यालयात प्रवेश केला. हिंदु विद्यार्थ्‍यांनी जशास-तसे दिलेल्‍या या उत्तरासाठी हिंदु समाजातून त्‍यांचे कौतुक केले जात आहे.