सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त फरीदाबाद येथे हिंदु एकता दिंडी चालू असतांना पाऊस येणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्‍यावर पाऊस पडण्‍याचे थांबणे

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ७.५.२०२३ या दिवशी फरीदाबाद येथे हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते. हिंदु एकता दिंडी चालू झाल्‍यावर पाऊस येऊ लागला आणि वारेही वेगाने वाहू लागले. जवळ जवळ १० मिनिटांपर्यंत पाऊस पडत होता. सर्व साधक पावसातच चालत होते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

तेव्‍हा मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारण्‍यासाठी भ्रमणभाष केला. थोड्या वेळानंतर सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी भ्रमणभाष करून विचारले,

कु. मनीषा माहुर

‘‘आता पाऊस अल्‍प झाला का ?’’ त्‍या वेळी प्रत्‍यक्षात पाऊस अल्‍प प्रमाणात पडत होता आणि थोड्या वेळानंतर पाऊस पूर्णपणे थांबला.

दिंडीची सांगता झाल्‍यानंतर मी सद़्‍गुरु काकांना भ्रमणभाष केला. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले, ‘‘नामजपादी उपाय करत असतांना माझा चेहरा आणि डोळे येथे मला आवरण जाणवत होते. मी चेहरा आणि डोळे यांवरील आवरण काढल्‍यावर मला जाणवले, ‘आता पाऊस अल्‍प झाला आहे.’’

नंतर माझ्‍या लक्षात आले, ‘ज्‍या मार्गावरून दिंडी निघाली होती, तेथे पावसाचे पाणी साठले होते.’

दिंडी चालू असतांना १० मिनिटे पाऊस पडत होता आणि वेगाने वारे वहात होते, तरीही साधक दिंडी सोडून दुसरीकडे गेले नाहीत. त्‍या वेळी दिंडीत बालसाधकही चालत होते.

गुरुदेव आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांच्‍या कृपेनेच हिंदु एकता दिंडी निर्विघ्‍नपणे पार पडली.’

– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र (२७.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक