अध्यात्माच्या दृष्टीने आश्रमजीवनाचे महत्त्व !

‘अध्यात्मात आश्रमजीवन अनुभवणे आवश्यक आहे. आश्रमात आपल्या व्यावहारिक इच्छापूर्तीचा विचार न ठेवणे, हीच खरी साधना आहे.

१. ‘सेवाकेंद्राच्या नवीन वास्तूमध्ये पुष्कळ खोल्या असल्याने एका खोलीत दोघे दोघे राहू’, असे एका साधिकेने म्हणणे

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहलीमधील सनातन संस्थेचे सेवाकेंद्र नवीन वास्तूमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर प्रसारातील एक साधिका म्हणाली, ‘‘आता येथे पुष्कळ खोल्या आहेत. त्यामुळे आता आपण एकेका खोलीत दोघे दोघेही राहू शकतो.’’ (त्या वेळी सेवाकेंद्रातील साधक प्रसारासाठी बाहेर गेले होते आणि काही साधक घरी गेले होते.) प्रत्यक्षात खोल्या मोठ्या असल्यामुळे गुरुकृपेने आम्ही एका खोलीत ६ साधक सहजतेने रहात होतो.

२. आश्रमजीवनाच्या संदर्भात सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन

कु. पूनम चौधरी

२ अ. आश्रमजीवनात अनेक साधक एका खोलीत एकमनाने राहू शकले, तर त्यातून त्या सर्वांचीच साधना होणे : खोल्यांमध्ये एकत्र रहाण्याच्या संदर्भात सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितले, ‘‘साधकांची मने जुळणे हे अध्यात्मात महत्त्वाचे आहे. अनेक साधक मोठ्या खोलीत एकमनाने एकत्र राहू शकले, तर सर्वांचीच साधना होईल. जागा आहे; म्हणून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो आणि आमची मने एकमेकांशी जुळली नाहीत, तर आश्रमजीवनाचा साधनेसाठी उपयोगच होणार नाही. जर आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो, तर पाश्‍चात्त्य (स्वकेंद्रित आणि स्वार्थी) मनोवृत्ती प्रबळ होईल.’’

२ आ. अधिक संख्येने साधक एकत्र राहिल्यास त्यातून साधकांचे श्रम आणि वेळ वाचून ‘गुरुसेवा आणि गुरुकार्य’ परिणामकारक करणे शक्य होणे : साधकाच्या जीवनात त्यातही आश्रमजीवनात ‘गुरुसेवा आणि गुरुकार्य’ हेच प्राधान्याने असते. आश्रमात कधी साधकसंख्या अल्प झाली असेल, तर काही खोल्या बंद ठेवण्यात येतील. त्यामुळे प्रतिदिन करायची स्वच्छतेची सेवा न्यून होऊन आपण साधकसंख्या अल्प असूनही प्रसार सेवा आणि इतर समष्टी सेवा यांसाठी वेळ उपलब्ध करू शकतो.

– संग्राहक, सुश्री पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (१३.१.२०२३)