|
बगदाद (इराक) – येथे शेकडो लोकांनी स्विडनच्या दूतावासामध्ये घुसून आग लावली. जून मासामध्ये स्विडनमध्ये कुराण जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर १९ जुलै या दिवशी पुन्हा एकदा स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथील पोलिसांकडे २ जणांकडून कुराण आणि इराकचा राष्ट्रध्वज जाळण्याची अनुमती मागण्यात आली होती.
इराक स्थित स्वीडन के दूतावास में घुसी मुस्लिम भीड़, की आगजनी और पढ़ी नमाज: कुरान जलाए जाने का विरोध, कर्मचारियों को निकाला गया#Sweden #QuranBurning #Iraqhttps://t.co/ygS1NPFoSx
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 20, 2023
यात मागील वेळेला कुराण जाळणारा सलवान मोमिका याचा समावेश होता. पोलिसांनी याला अनुमती दिली. या अनुमतीला विरोध म्हणून बगदादमध्ये स्विडनचे दूतावास पेटवण्यात आले. या घटनेत दूतावासातील कोणत्याही कर्मचार्याला दुखापत झाली नाही. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच सरकारने सुरक्षादलांना दूतावासाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.