पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील ९ टक्‍के विद्यार्थी आधारकार्डाविना !

प्रतीकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – अनुदानाच्‍या कक्षेत येणार्‍या शाळा-महाविद्यालयांत कार्यरत शिक्षकांच्‍या वेतन अनुदानासाठी संच मान्‍यता आवश्‍यक आहे. त्‍याची प्रक्रिया चालू करण्‍यात आली असून शासनाच्‍या शैक्षणिक योजनांचा लाभ ज्‍या विद्यार्थ्‍यांना दिला जातो, त्‍यांचे आधारकार्ड अद्ययावत् करणे बंधनकारक आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘स्‍टुडंटस् पोर्टल’वर १५ जुलैपर्यंत विद्यार्थ्‍यांचे आधार प्रमाणीकरण करण्‍याची अंतिम मुदत दिली होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे शहरातील ९ टक्‍के विद्यार्थ्‍यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे.

अनुदानास पात्र असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना गणवेश, पोषण आहार, विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके आणि सरकारी योजना यांचा लाभ दिला जातो. आधारकार्ड अद्ययावत् न करणार्‍या विद्यार्थ्‍यांना अनुदान मिळणार नसल्‍याचे प्रशासनाने सांगितले.

संपादकीय भूमिका

ही स्‍थिती गंभीर आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !