पुणे – राजस्थानमधील जयपूर शहरात बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असलेल्या अल्-सुफा या आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या इम्रान खान आणि महंमद युनूस साकी अशा दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. ३० मार्च २०२२ या दिवशी राजस्थान पोलिसांनी एका चारचाकीमधून स्फोटके घेऊन जातांना बशीर खान शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता.
१८ जुलैला मध्यरात्री अडीच वाजता कोथरूड पोलिसांच्या गस्ती पथकातील प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. जेव्हा त्यांना त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी नेले, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या, तर एक जण पसार झाला. (ही आहे पोलिसांची कार्यक्षमता ! आरोपी पळून जाण्याला उत्तरदायी असणार्या पोलिसांवर कारवाई करा ! – संपादक)
घराच्या झडतीत एक जिवंत काडतुस, ४ भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक जप्त करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून तेहे तिघे जण पुण्यात वास्तव्यास आहेत. इम्रान याच्यावर यपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये धर्मांधांचा वाढता सहभाग ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करते. हे वास्तव सरकारने लक्षात घेऊन अशांवर कठोरात कठोर कारवाई करावी ! |
#Terrorists_Arrested_in_Pune | कोथरुड भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पोलीस कोठडी@Policenama1 #policenama @PuneCityPolice @DGPMaharashtra @CPPuneCity https://t.co/8pdoCE0848
— Policenama (@Policenama1) July 19, 2023