‘एका साधिकेने सत्संगात प्रसार सेवेतील काही अनुभव सांगितले. एका वाचकाच्या मुलाने त्या साधिकेला विचारले, ‘‘तुम्ही जी सेवा करता, त्याचे तुम्हाला किती वेतन मिळते ?’’ त्या साधिकेने सांगितले, ‘‘आम्ही आनंदप्राप्तीसाठी आणि ‘आमची साधना व्हावी’, यासाठी विनामूल्य सेवा करतो.’’ तेव्हा सत्संगात एका साधकाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे एक वाक्य सांगितले, ‘साधना हा २४ तासांचा ‘जॉब’ असून देव आमचा ‘बॉस’ आहे आणि ‘चैतन्य’ ही आमची ‘सॅलरी’(पगार) आहे.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२३)