|
वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरातील विविध देशांतील लोक त्यांच्या जीवनकाळात किती जणांशी लैंगिक संबंध ठेवतात, यासंदर्भातील सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने केलेल्या या सर्वेक्षणानुसार इस्लामी देश तुर्कीये याचा या सूचीत प्रथम क्रमांक असून तुर्की लोक अनुमाने १४ हून अधिक जणांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करतात. यानंतर ऑस्ट्रेलिया १३, न्यूझीलँड १३ आणि आईसलँड १३, तर दक्षिण आफ्रिकी लोक १२ जणांशी शारीरिक संबंध ठेवतात, असे या अहवालातून समोर आले आहे.
या सूचीत प्रगत देशांचा विचार करता इटॅलियन लोक अनुमाने ११ लोकांशी लैंगिक संबंध ठेवतात, तर अमेरिका, कॅनडा आणि जपान १०, युनायटेड किंगडम आणि रशिया ९, तर जर्मनी या देशांमध्ये याचे प्रमाण ६ इतके आहे. या सूचीनुसार काही भारतीय त्यांच्या जीवनकाळात सरासरी ३ लोकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. (भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे स्वैराचारी प्रकार वाढल्यामुळेच नीतीमत्ता ढासळत आहे, याचे हे उदाहरण ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|