गाजियाबाद (उत्तरप्रदेश) – नोएडामध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्या हिंदु तरुणीच्या धर्मांतराची घटना समोर आली आहे. ही तरुणी तिच्या वडिलांना शरीयतविषयी सांगत होती. यावरून तिच्या वडिलांना शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने धर्मांतर केल्याचे आणि यामागे काही जण असल्याचे उघड झाले. यानंतर राहिल खान आणि अन्य २ जण यांना अटक करण्यात आली. ही तरुणी राहिल खान याच्या आस्थापनात काम करत होती. राहिल खान याने स्वतःचे नाव राहुल अग्रवाल असे सांगितले होते. पोलिसांच्या चौकशीत राहिल खान याचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Was ready to become a suicide bomber: Father of Ghaziabad Hindu victim whom Rahil groomed to accept Islam posing as Rahul Agarwalhttps://t.co/NjBrDCSmCq
— OpIndia.com (@OpIndia_com) July 8, 2023