अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित होणार उत्तर भारतातील कुख्यात गुंड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्यात झाली चर्चा !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तर भारतातील कारागृहांत बंदी असलेल्या १० ते १२ कुख्यात गुंडांना अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात अन्वेषण यंत्रणा आणि मंत्रालय यांच्या अधिकार्‍यांमध्ये नुकतीच एक बैठक झाली.

१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला देहली, पंजाब आणि हरियाणा येथील कारागृहांत बंद असलेल्या अशा गुंडांना स्थानांतरित करायचे आहे, जे कारागृहात राहूनही गुन्हेगारांचे संघटन करत आहेत. यंत्रणेला त्यांचे हे संघटन उद्धवस्त करायचे आहे.

. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील दिब्रूगड केंद्रीय कारागृहातही या गुंडांना पाठवण्यावर यंत्रणा विचार करत आहे. सध्या तेथे खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंह आणि त्याचे सहकारी अटकेत आहेत.

३. याआधी दक्षिण भारतीय राज्यांच्या कारागृहांमध्ये गुंडांना पाठवण्याची यंत्रणेची शिफारस होती; परंतु त्यासाठी तेथील राज्य सरकारांची अनुमती घ्यावी लागते. अंदमान-निकोबार केंद्रशासित प्रदेश असल्याने तेथे कुणाची अनुमती न घेता थेट केंद्रीय गृहमंत्रालय निर्णय घेऊ शकते.