वर्ष २०२४ च्या अंतापर्यंत हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमंत प्रवीणगिरि महाराज

गिरनार, गुजरात : येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी मंगळुरू, कर्नाटक येथे जात असतांना शनैश्वर नगर, मोड्डी, नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन श्री शनिमहाराजांचे दर्शन घेतले. या वेळी श्री शनिमंदिर देवस्थान समितीने त्यांचे स्वागत केले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ‘वर्ष २०२४ च्या अंतापर्यंत हिंदु राष्ट्र येणार’, असे महाराजांनी सांगितले.