|
मुंबई – हिंदूंच्या देवतांचा अनादर करणार्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केल्यावर आता चित्रपटात बिभीषणाची भूमिका केलेल्या सिद्धांत कार्निक यांनी चित्रपटाचे संतापजनक समर्थन केले आहे. ते म्हणाले की, आमच्या देवता या अत्यंत ‘कूल’ (छान) असल्याने त्यांना ‘सुपरहिरो’सारखे दाखवायला हवे. यामुळे युवा पिढीला ते पहायला आवडेल आणि आपल्या देवतांविषयी माहिती मिळू शकेल !
Adipurush के ‘विभीषण’ ने किया फिल्म को सपोर्ट, बोले- हमारे देवताओं को सुपरहीरो से ज्यादा कूल दिखाने की जरूरत#Adipurush #VibhishanSiddhant #Entertainmenthttps://t.co/H4Zh16i7HV
— Dainik Jagran (@JagranNews) June 29, 2023
हिंदु असल्याने चित्रपटामुळे माझ्याही भावना दुखावल्या गेल्या ! – अभिनेते लवी पजनीदुसरीकडे कुंभकर्णाची भूमिका केलेल्या लवी पजनी यांनी म्हटले की, या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना आमच्यापैकी कुणालाच हे ठाऊक नव्हते की, या चित्रपटामुळे एवढा वाद निर्माण होईल ! आता जरी चित्रपटातील वक्तव्ये पालटण्यात आली असली, तरी एक हिंदु असल्याने माझ्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत ! मीसुद्धा अशा गोष्टी सहन करू शकत नाही ! |
कार्निक पुढे म्हणाले की, देवतांवर आधारित चित्रपट हे पॉप संस्कृतीचा आधार घेऊन बनवायला हवेत. मी माझे पुतणे, तसेच माझ्या काही मित्रांनाही ‘स्पायडरमॅन’ आणि ‘सुपरमॅन’ यांची चित्रे असलेले टी-शर्ट घातलेले पहातो. आपला इतिहास तर पौराणिक देवतांच्या गोष्टींनी भरलेला आहे. लहान मुले ‘सुपरमॅन’च्या गोष्टी पहातात. त्यामुळे आपल्या देवतांनाही त्याच पद्धतीने प्रदर्शित केले पाहिजे !
संपादकीय भूमिका
|