देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

  • आरोपी जैद फरार !

  • पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

नवी देहली – येथील बृजपुरी क्षेत्रामध्ये २३ जूनच्या रात्री २० वर्षीय महंमद जैद याने १९ वर्षीय राहुल याच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले. पोटाच्या खालच्या भागात चाकू घुसल्याने राहुलची स्थिती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या वेळी त्याचा चुलत भाऊ सोनू हाही जैदच्या आक्रमणात घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर जैद फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. परिसरात तणाव असून कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी राखीव दलाचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

उत्तर-पूर्वी देहलीचे पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी सांगितले की, जैद आणि राहुल दोघेही एकाच परिसरात रहात असून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात आधीपासूनचा वाद असून त्यातूनच जैदने हे आक्रमण केले आहे. याला ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’ असा रंग देण्यात येऊ नये. जैदचे कुटुंब त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे साहाय्य करत आहे. (घटनेचा वस्तूनिष्ठ अभ्यास करूनच एका निष्कर्षापर्यंत पोचले पाहिजे; परंतु हिंदु युवकांचा मुसलमान युवकांशी वाद झाला, तरी नेहमी हिंदूच का मार खातात ? ते कधी चाकू खुपसण्यापर्यंतच्या हिंसेचा विचार का करत नाहीत ? याचा विचारही व्हायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जर देशाची राजधानी देहलीमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत असतील, तर देशातील अन्य क्षेत्रांचा विचारच न केलेला बरा !
  • धर्मांधांची जिहादी वृत्ती नाकारून हिंदूंना वार्‍यावर सोडणारे पोलीस जनहित काय साधणार ?