गोवा : वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू

(वस्त्रसंहिता : मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवी

मडगाव, २४ जून (वार्ता.) – वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवी मंदिर

मंदिराच्या व्यवस्थापन समितीने लावलेल्या या फलकावर लिहिले आहे की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरात प्रवेश करणारे महाजन, भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शॉर्ट्स (अर्धी पँट), मिनी स्कर्ट, मिडीस, ‘स्लीव्हलेस टॉप्स (ब्लाऊज)’, लो वेस्ट जीन्स आणि तोकडे टी-शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोव्यात अशा प्रकारची वस्त्रसंहिता यापूर्वी इतर काही मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली आहे.