सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मस्‍थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्‍यांचे नाव दिले जाणे आणि त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून पुष्‍कळ चैतन्‍य सर्वत्र पसरत असून नागोठणे गाव हे साधनेचा मार्ग असलेले गाव होणार आहे’, असे वाटणे

३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त त्‍यांच्‍या जन्‍मस्‍थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्‍यांचे नाव द्यायचे’, असे नागोठणे येथील ग्रामस्‍थांनी ठरवले होते. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या हस्‍ते त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून चैतन्‍याच्‍या दैवी कणांचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात ओघ येत असून तो पूर्ण गावात (नागोठण्‍यामध्‍ये) पसरत आहे’, असे मला दिसले.

पू. (सौ.) संगीता जाधव

या मार्गावरून जाणारा जीव साधनेला लागणार असून हे गाव साधनेचा मार्ग असलेले गाव होणार आहे. त्‍या मार्गावरील सर्व इमारती, छोटी-मोठी घरे, त्‍या गावात जन्‍मलेले जीव, त्‍या मार्गावर ज्‍यांची घरे आहेत, ते सर्वच भाग्‍यवंत आहेत; कारण तिथे प्रत्‍यक्ष भगवंताने जन्‍म घेतला आहे. मला त्‍या सर्वांप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्‍म झालेली वास्‍तू बघून ‘त्‍या वास्‍तूत लहानपणी त्‍यांचा वावर कसा झाला असेल ?’, या विचाराने माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. त्‍या दिव्‍य वास्‍तूत मला बाळकृष्‍णाचे अस्‍तित्‍व जाणवत होते.’

– पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत), ठाणे सेवाकेंद्र (१२.५.२०२३)


श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचे प्रीतीमय बोलणे ऐकून त्‍यांच्‍यात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप अनुभवता येऊन पुष्‍कळ कृतज्ञता वाटणे

‘रामनाथी आश्रमात मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींना भेटायला गेले. त्‍यांच्‍याकडे आपण मानव म्‍हणून बघितले, तर त्‍या मानव दिसतील आणि अवतार म्‍हणून पाहिले, तर अवतार म्‍हणून आपण त्‍यांना अनुभवू शकतो. त्‍यांना भेटतांना मला फार भरून आले आणि त्‍याही मला भेटायला फार उत्‍सुक होत्‍या. त्‍यांची प्रीतीमय वाक्‍ये त्‍यांच्‍यातील दिव्‍यत्‍वाची साक्ष देत होती. मला त्‍यांची सर्वांप्रतीची अमर्याद प्रीती अनुभवता आली. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्‍यांचे प्रतिरूप कसे निर्माण केले आहे ?’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.’

– पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत), ठाणे सेवाकेंद्र (११.५.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.