मुंबई – मुंबई आणि पुणे येथे बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्याला मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांचे साहाय्य घेतले. अंधेरी आणि कुर्ला येथे २४ जूनला सायंकाळी साडेसहा वाजता बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये उत्तरप्रदेश येथून हा धमकीचा दूरभाष आला होता. यापूर्वी २३ जून या दिवशीही सकाळी १० वाजता बाँबस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. बाँबस्फोट करण्यासाठी २ कोटी रुपये मिळाल्याचे अटक केलेल्या आरोपीने म्हटले आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील शोध चालू आहे.