
१. अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, जळगाव
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्यंत प्रसन्न वाटले आणि माझे मन उल्हसित झाले. मला पुष्कळ आनंद झाला.
आ. फारच सुंदर ! ‘अशा प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रात कार्य होऊ शकते’, याचे मला आश्चर्य वाटले.
इ. ‘चांगले नियोजन आणि व्यवस्थापन अशा प्रकारे सेवाभावी कार्यातून होते’, हे मला प्रत्यक्ष पहाता आले. पुष्कळ आभार !’
२. श्री. शशिकांत कृष्णा पाटील, खोपोली, जिल्हा रायगड.
अ. ‘या वेळी मला रामनाथी आश्रमात आल्यानंतर पुष्कळ प्रसन्न वाटले.
आ. मला आश्रमात येण्याची ओढ लागली होती.’
३. श्री. प्रशांत रवींद्रनाथ जाधव (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), सातारा
अ. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला सकारात्मक ऊर्जा मिळाली.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)
आश्रमातील ‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, जळगाव
अ. ‘पी.पी.टी. पहातांना मला वाटले, ‘हे सर्व केवळ अद़्भुत आहे !’
आ. ‘सूक्ष्म सूत्रांचा विचार करून अशा प्रकारे संशोधन करता येते’, याचे ज्ञान मला मिळाले.’
२. श्री. शशिकांत पाटील, खोपोली
अ. ‘पी.पी.टी. शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध केल्यामुळे माझ्या बुद्धीला विषयाचे लगेच आकलन झाले.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेले पालट आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !