१. ‘काही हिंदुत्वनिष्ठांना ‘संतांशी कसे वागायचे ?’, हेही ठाऊक नाही, उदा संतांना ‘कृतज्ञता’ न म्हणता ते ‘थँक्स्’ किंवा ‘धन्यवाद’ म्हणतात. संतांकडे स्वतःचे म्हणणे मांडतांना ‘माझेच म्हणणे कसे योग्य आहे ?’, या विचाराने त्यांच्याकडून मोठ्याने आणि आग्रही भूमिकेतून बोलणे होते. ‘हिंदुत्वनिष्ठांनी संतांशी कसे वागायचे ?’, हे शिकून घेणे आवश्यक आहे.
२. संतांच्या शिकवणीचा गाभा लक्षात न घेता त्यांच्याबद्दल बुद्धीच्या स्तरावर तर्क काढून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, उदा. संतांनी त्यांना ‘कार्य चांगले होण्यासाठी साधना करा’, असे सांगितले, तर ते विचार करतात, ‘आता धर्मावर इतकी आक्रमणे होत असल्याने पुष्कळ कार्य करायचे आहे. असे असतांना साधना करायला वेळ कसा देणार ?’ त्यामुळे ते साधना करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. ते हे लक्षात घेत नाहीत की, संतांनी कार्य थांबवायला सांगितलेले नाही. कार्य करतांनाच साधना करायला सांगितले आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले