परळ येथे चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र खाली कोसळले !

९ जण घायाळ

प्रतिकात्मक चित्र

परळ (मुंबई) – कमला मिल येथील ट्रेड वर्ल्‍ड या १६ मजली इमारतीमध्‍ये चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र (लिफ्‍ट) खाली कोसळले. यामध्‍ये ९ जण घायाळ झाले. त्‍यांना जवळच्‍या रुग्‍णालयांत भरती करण्‍यात आले आहे. घायाळ झालेल्‍यांची प्रकृती स्‍थिर आहे.