नाटे (जिल्हा रत्नागिरी), १७ जून (वार्ता.) – सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्या येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणे (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून या दिवशी रात्री ११ वाजता रहात्या घरी देहत्याग केला. त्या गेले काही दिवस रुग्णाईत होत्या. पू. शहाणेआजी वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. पू. शहाणेआजींनी ८ डिसेंबर २०१५ या दिवशी व्यष्टी संतपद प्राप्त केले. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, ४ सुना, नातवंडे, नातसुना, नातजावई आणि पतवंडे असा परिवार आहे.
१७ जून या दिवशी सकाळी ११ वाजता नाटे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.