मुंब्रा येथील शहानवाजच्या भ्रमणभाषमध्ये आढळले ३० पाकिस्तान्यांचे क्रमांक आणि ई-मेल पत्ते !

गाझियाबाद आणि मुंब्रा येथील ऑनलाईन ‘खेळ जिहाद’चे प्रकरण

(‘खेळ जिहाद’ म्हणजे ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करणे)

आरोपी शहानवाज मकसूद खान

मुंब्रा (जिल्हा ठाणे) – गाझियाबाद आणि मुंब्रा येथील ऑनलाईन ‘खेळ जिहाद’चे प्रकरणी पोलिसांनी अलिबाग येथून अटक केलेल्या आरोपी शहानवाज मकसूद खान याच्या भ्रमणभाषमध्ये ३० पाकिस्तानी लोकांचे क्रमांक मिळाले आहेत. तो ६ ई-मेल पत्ते वापरत होता आणि त्यांपैकी एका ई-मेल पत्त्यावर पाकिस्तानातून आलेले ई-मेल आढळले आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी व्यक्तींच्या क्रमांकाविषयी काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस शाहनवाझविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.

शहानवाज याच्यावर खेळाच्या माध्यमातून ४०० हिंदु मुलांचे धर्मांतर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंब्यात शहानवाज हा बनावट ‘युजर आयडी’ (खाते) बनवून त्या माध्यमातून तो संबंधित खेळ उपलब्ध करून देत होता आणि हरलेल्या मुलांना न हारण्याचे आमिष दाखवून कलमा वाचायला भाग पाडत होता.

धर्मांतराची कोणतीही तक्रार आली नसल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले. (तक्रार आली नाही, म्हणजे धर्मांतरे झाली नाहीत, असे नाही, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांना काय म्हणायचे आहे ?