‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीविष्‍णुरूप प्रगट झाले’, असे अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

१. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या भोवती पुष्‍कळ मोठी आणि प्रकाशमान प्रभावळ दिसून ती आश्रमाच्‍या बाहेरही पुष्‍कळ दूरवर पसरली आहे’, असे जाणवणे

पू. (सौ.) संगीता जाधव

‘ब्रह्मोत्‍सवानंतर मी आणि सद़्‍गुरु अनुताई (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर) सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटायला गेलो. तेव्‍हा गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) नुकतेच ब्रह्मोेत्‍सवाहून परत आले होते. त्‍यांचे दर्शन घेतांना मला ‘त्‍यांच्‍या भोवती प्रकाशाची पुष्‍कळ मोठी प्रभावळ दिसून ती पुष्‍कळ दूरवर पसरली आहे’, असे जाणवत होते. जसे आपल्‍याला सूर्याचा प्रकाश पुष्‍कळ दूरवर पसरलेला दिसतो आणि त्‍या प्रकाशाच्‍या मध्‍यभागी सूर्य अगदी लहानसा दिसतो, तसे  मला गुरुदेवांच्‍या भोवतीच्‍या प्रकाशाची प्रभावळ आश्रमाच्‍या बाहेर पुष्‍कळ दूरवर पसरलेली दिसून त्‍या प्रकाशात त्‍यांचा चेहरा अगदी लहान दिसत होता.

२. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीविष्‍णुरूप प्रकट झाले असून त्‍यांच्‍या भोवती दिसणार्‍या प्रकाशमान प्रभावळीकडे पाहून शांत वाटणे आणि त्‍यांच्‍याशी बोलतांना आनंद अन् शांती अनुभवणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या भोवती दिसणारी प्रभावळ पाहून ‘आज गुरुदेवांचे साक्षात् विष्‍णुरूप प्रकट झाले आहे’, असे मला वाटले. त्‍यामुळे ‘साक्षात् भगवान श्रीविष्‍णु आमच्‍यासमोर बसला आहे’, या भावाने मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती. गुरुदेव आमच्‍याशी बोलत असतांना त्‍यांच्‍या चेहर्‍याभोवती पुष्‍कळ मोठी प्रकाशमान प्रभावळ दिसत असूनही त्‍या प्रभावळीकडे पहातांना मला शांत वाटले. ‘साक्षात् भगवान विष्‍णु आमचा सर्वांचा उद्धार करणार आहे’, या भावाने आम्‍ही (मी आणि सद़्‍गुरु अनुताई) आनंदाने भरून गेलो होतो. ‘आम्‍ही त्‍यांच्‍याशी काय बोलत होतो ?’, याचे आम्‍हाला भानच नव्‍हते. त्‍यांच्‍याशी बोलतांना आम्‍हाला शब्‍दांपलीकडील आनंद आणि शांती यांची अद़्‍भुत अवस्‍था अनुभवता आली.’

– पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत), ठाणे सेवाकेंद्र (११.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक