धर्मध्‍वजाच्‍या पूजनाच्‍या वेळी मुंबई येथील सौ. स्नेहल विलास गुरव यांना आलेल्‍या अनुभूती

‘११.६.२०२२ या दिवशी दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात धर्मध्‍वजाचे पूजन करण्‍यात आले. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे विधीवत् पूजन करण्‍यात आले. तेव्‍हा तेथे मीही उपस्‍थित होते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथेे दिल्‍या आहेत.

सौ. स्नेहल गुरव

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहून साधिकेचे मन स्‍थिर होणे आणि ‘प्रत्‍यक्ष देवी पहात आहे’, असे अनुभवणे

धर्मध्‍वजाच्‍या पूजनाला संतांचीही उपस्‍थिती होती. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहून माझे मन स्‍थिर झाले. ‘प्रत्‍यक्ष देवी माझ्‍याकडे पहात आहे’, असे मी अनुभवत होते. ‘माझी काहीच पात्रता नसतांनाही देवाने मला हा क्षण पहायला आणि अनुभवायला दिला’, याविषयी मला कृतज्ञता वाटत होती.

२. धर्मध्‍वजाच्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि क्षात्रगीत कानांत ऐकू येऊन भावजागृती होणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्व साधकांना डोळे बंद करायला सांगितले. तेव्‍हा मला मोगर्‍याचा सुगंध आला. त्‍या वेळी धर्मध्‍वजाच्‍या ठिकाणी मला गुरुमाऊलींचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले. त्‍यानंतर ‘सनातन धर्म सूर्य उगवला ।’, हे क्षात्रगीत मला कानांत ऐकू येऊ लागले. त्‍या वेळी ‘मी कोणत्‍या तरी वेगळ्‍याच विश्‍वात आहे’, असे मला वाटले. तेव्‍हा माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.

३. ‘कृतज्ञता, कृतज्ञता’, असा आवाज मला आतून ऐकू येत होता.’

– सौ. स्नेहल विलास गुरव, मुंबई (१३.६.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक