धर्मांधाच्या जाचाला कंटाळून राष्ट्रीय बेसबॉल महिला खेळाडूची आत्महत्या !

  • धर्मांतरासाठी धमकी देणार्‍या अब्दुल मंसुरी याला अटक

  • हिंदु नाव धारण करून अब्दुल याने केली होती मैत्री  

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू संजना बरकडे हिला अब्दुल मंसुरी याच्याकडून सातत्याने धर्मांतरासाठी धमक्या येऊ लागल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ५ जून २०२३ या दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल मंसुरी याला अटक केली आहे.

१. संजनाच्या वडिलांनी सांगितले की, अब्दुल याने हिंदु असल्याचे सांगून संजनाशी मैत्री केली होती. वर्षभर त्यांच्यामध्ये मैत्री होती. संजनाला ‘अब्दुल मुसलमान आहे’, हे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. यामुळे तो तिला धमकावू लागला होता.

२. संजनाची आईने सांगितले की, अब्दुल मंसुरी उपाख्य राजन खान संजनावर सातत्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. एकदा त्याचा दूरभाषा आला होता. तेव्हा त्याने मला सांगितले, ‘तुमच्या मुलीला इस्लाम स्वीकारण्यास सांगा. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. जर तुम्ही सर्वांनी इस्लाम स्वीकारणार नाही, तर आम्हाला तुमचे घर कुठे आहे ते ठाऊक आहे. आम्ही तुम्हाला ठार करू. जर इस्लाम स्वीकाराल, तर काहीही करणार नाही.’

३. अब्दुल याने संजनाची काही कागदपत्रे आणि तिने जिंकलेली पदके चोरली होती. जेव्हा संजनाला याची माहिती मिळाली, तेव्हा तिने त्याच्याकडे परत मागितले. यावर त्याने इस्लाम स्वीकारण्यास सांगितले.

संपादकीय भूमिका 

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही. त्यामुळे अशांना आता शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा कमरेभर खड्ड्यात गाडून त्यांना दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !