परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी श्री. उमेश नाईक यांना आलेल्या अनुभूती

श्री. उमेश नाईक

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी आम्ही काही साधक हातात फलक घेऊन सहभागी झालो होतो. त्या वेळी मी पूर्णवेळ हातात फलक धरूनही मला ‘हात, पाय किंवा शरीर दुखले’, असे काहीच झाले नाही.

२. मला देहाची जाणीव नव्हती. त्या वेळी मला वेगळीच भावस्थिती अनुभवता आली.

३. रथोत्सवाच्या वेळी रथ जाण्याच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना साधक उभे होते. त्यांच्यातील भाव पाहून मीही अत्युच्च भावस्थिती अनुभवत होतो.’

– श्री. उमेश नाईक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६६ वर्षे), मडकई, गोवा. (२८.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक