(म्‍हणे) ‘रायगडावरील राज्‍याभिषेक सोहळा हा सनातनी सत्तेचा उन्‍माद !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्‍याभिषेक सोहळा हा सनातन धर्मप्रचारासाठी होता का ? छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेले राज्‍य सनातनी नव्‍हते, तर रयतेचे स्‍वराज्‍य होते. तुम्‍ही रायगडाच्‍या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्‍माद केला आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक राष्‍ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही पुन्‍हा पुन्‍हा चूक करत आहात. जनता लवकरच तुमचा टकमक टोकावरून कडेलोट करेल. ज्‍या सनातनी प्रवृत्तीने शिवराय यांचा राज्‍याभिषेक नाकारला, त्‍यांनाच डोक्‍यावर घेऊन मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी सत्तेचा उपयोग करून तिथीनुसार हा कार्यक्रम केला. शिवप्रेमी जनता याचे चोख उत्तर देईल.’’ (शिवरायांचा राज्‍याभिषेक करणारे गागाभट्ट हे हिंदु धर्माचेच पाईक होते. शिवरायांनी राज्‍याभिषेक हिंदु वैदिक पद्धतीने करून घेतला. येनकेनप्रकारेण हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्‍यांचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

अफझलखानवधाच्‍या चित्राला झालेल्‍या विरोधाविषयी अवाक्षरही न काढणार्‍यांना शिवराज्‍याभिषेक सोहळा हिंदु वैदिक पद्धतीने साजरा झाल्‍यावर कंठ फुटतो, हे लक्षात घ्‍या !