यवतमाळ बसस्‍थानक येथे स्‍त्रियांच्‍या दागिन्‍यांची लूट चालूच !

राज्‍यात कायदा-सुव्‍यवस्‍था नसल्‍याचेच लक्षण !

यवतमाळ बस स्थानक (संग्रहित चित्र)

यवतमाळ, २ जून (वार्ता.) – अनेक मासांपासून बसस्‍थानकावरून स्‍त्रियांच्‍या दागिन्‍यांची लूट चालूच असून पोलिसांची हतबलता लक्षात येते. उन्‍हाळी सुट्टी, लग्‍नसमारंभ आणि ५० टक्‍के प्रवास सवलतीमुळे बसस्‍थानकावरील स्‍त्रियांची गर्दी वाढलेली आहे, त्‍याचा अपलाभ लुटारू घेत आहेत. २९ आणि ३० मे या दोन्‍ही दिवशी ८० सहस्र रुपयांचे सोन्‍याचे दागिने लुटले गेले. पोलीस यंत्रणेच्‍या नियोजनशून्‍यतेमुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे. (गुन्‍हेगारांना पोलिसांचा काही धाकच नसल्‍याचे हे लक्षण आहे. याचा पोलिसांनी विचार करायला हवा ! – संपादक)