नगर येथे ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रकार बजरंग दलाच्‍या सतर्कतेमुळे उघड !

प्रतीकात्मक छायाचित्र

संगमनेर (जिल्‍हा नगर) – येथील हिंदूबहुल भाग बटवाल मळा येथे काही मासांपासून एका कुटुंबातील ४-५ महिला आणि २-३ महाविद्यालयीन तरुणी यांनी शेजार्‍यांचा विश्‍वास संपादन करून धर्मांतराचा प्रकार चालू केला होता. ‘हिंदूंचे देव निर्जीव, दगडाचे असतात. प्रभु येशूच आपले रक्षण करू शकतो’, असे फादर बापू बोरगे या ठिकाणी धर्मांतराच्‍या उद्देशाने आलेल्‍या महिलांना सांगू लागला. येशूचे रक्‍त प्रसाद म्‍हणून देऊ लागला. येथील काही हिंदु नागरिकांनी बजरंग दलाला कळवताच दलाचे कार्यकर्ते आणि दुर्गावाहिनीच्‍या रणरागिणी येथे आल्‍या असता त्‍यांना येथील बंगल्‍याच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर ‘मिनी चर्च’ बनवलेले दिसले. त्‍यात एक धारिका सापडली, ज्‍यामध्‍ये सहस्रो हिंदू नियमितपणे प्रार्थनेला येण्‍याची उपस्‍थिती सापडली. डिसेंबर २०२३ पर्यंत १० सहस्र कुटुंबांत पोचण्‍याचा त्‍यांचा उद्देश होता. बजरंग दलाने पोलिसांना बोलावून धर्मांतराचे पुरावे दिल्‍यावर बापू बोरगे, जयश्री बोरगे यांच्‍यासह अन्‍य ४ जणांवर कारवाई करण्‍यात आली. (यातून ख्रिस्‍त्‍यांचे हिंदूंना धर्मांतरित करण्‍याचे प्रयत्न किती पद्धतशीरपणे चालू आहेत, हे लक्षात येते. हे रोखण्‍यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची आवश्‍यकता आहे. – संपादक)

बापू बोरगे आणि जयश्री बोरगे यांच्‍या २ मुली या सह्याद्री कॉलेज येथे शिकत असून येथील हिंदु मुलींना घरी बोलावून येशूची प्रार्थना करायला लावून रक्‍ताचे पाणी पाजत आहे. पालकांनी लक्ष ठेवून यांच्‍यासारख्‍या प्रवृत्तींपासून सावध रहावे, असे आवाहन बजरंग दलाचे प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर आणि शहर संयोजक शुभम कपिले यांनी पालकांना केले आहे.

संगमनेर (नगर) शहरात अन्‍य ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असलेले धर्मांतराचे प्रकार

१. संगमनेर शहरातील मध्‍यवर्ती भागात असलेल्‍या मालपाणी लॉन्‍स येथील ‘ए.सी. हॉल’मध्‍ये ‘ख्रिस्‍ती मिशनरी’कडून २५ ते २८ मे या दिवशी हिंदूंना बायबलची माहिती सांगून धर्मांतराचा मोठा कार्यक्रम चालू होता.

२. स्‍वतःला हिंदु म्‍हणवणारे प्रतिष्‍ठित व्‍यापारी पुरो(अधो)गामी धर्माचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी आणि काही पैशांसाठी स्‍वतः कार्यालय देतात.

३. नवरात्रीत मुलींना विनामूल्‍य दांडिया आणि सर्व पुरुषांना पैसे देऊन प्रवेश असा कार्यक्रम ‘मालपाणी लॉन्‍स’ येथे झाला. त्‍यात मुसलमान मुलांची संख्‍या लक्षणीय होती.

४. या नववर्षाच्‍या जल्लोष कार्यक्रमात ‘फेसबुक’वर ‘रील’ सिद्ध करणार्‍या मुसलमान कलाकारांना बोलावून त्‍यांचे नाच-गाणे आणि ‘ड्रिंक’ मुलींसाठी ठेवले होते, तर सर्व पुरुष मंडळींना पैसे घेऊन प्रवेश देण्‍यात आला होता. सकल हिंदु समाजाने या विरोधात पोलीस ठाण्‍यात तक्रार केल्‍यानंतर कार्यक्रम रहित केला होता. या मालपाणी लॉन्‍समध्‍ये अशा प्रकारे होणार्‍या कार्यक्रमांवर एकलव्‍यचे योगेश सूर्यवंशी यांनी नाराजी व्‍यक्‍त केली होती.