ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी ‘मेईतेई’ या हिंदु समाजाची घरे जाळली !

  • मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला !

  • शिथील केलेली संचारबंदी पुन्हा लागू !

इम्फाळ (मणिपूर) – मणिपूरमध्ये ‘मेईतेई’ या हिंदु समाजाला ‘अनुसूचित जमाती’चा दर्जा देण्याच्या विरोधात चालू झालेला हिंसाचार २१ दिवसांच्या संचारबंदीच्या शिथिलतेनंतर पुन्हा उसळला. २४ मे या दिवशी ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावली, तसेच गोळीबारही केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले. हिंसाचारामुळे संचारबंदीतील शिथिलता मागे घेण्यात आली. या घटनेनंतर आजूबाजूच्या गावांतील हिंदू असलेले अनुमाने १ सहस्त्र मेईतेई तरुण कुकी गाव जाळण्यासाठी जात होते; परंतु ‘आसाम रायफल्स’ने या तरुणांचा पाठलाग करत त्यांना रोखले.

१. २४ मेच्या सायंकाळी अचानक एका जमावाने निंगथौखोंग शहरातील राज्यमंत्री गोविंददास कोन्थौजम यांच्या निवासस्थानावर आक्रमण केले. हिंसक आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरातील सामानासह मालमत्तेची हानी केल्याचा आरोप आहे.

२. मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्यांमध्येही चिंता वाढली आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा म्हणाले की, मणिपूरची समस्या गंभीर आहे.

३. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौर्‍यावर येत आहेत. मणिपूर विधानसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राजकीय गटांचे शिष्टमंडळ गौहत्ती येथे त्यांची भेट घेणार आहे.

४. गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७५ जण ठार झाले असून २०० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत.

५. भारतीय सैन्यासह, इतर केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस दल मणिपूरमधील परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.