कर्णावती येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !

कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने येथून नारोल भागातून ३  तरुणांना अटक केली. हे तिघेही बांगलादेशी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का ? याचीही चौकशी केली जात आहे. यासह ते गुजरातमध्ये कसे आले ? आणि येथे येण्यामागील त्यांचा उद्देश काय होता ?, यांचीही चौकशी केली जात आहे.

पुढील मासामध्ये येथे होणार्‍या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या पूर्वी त्यांना अटक केल्याने त्यांचा जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याचीही चौकशी करण्यात येणार आहे.