त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मुसलमानांकडून शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न !

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक

नाशिक – त्र्यंबकेश्‍वर येथे १३ मे या दिवशी रात्री ९.४१ वाजता मुसलमानांच्या स्थानिक ऊरूसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट धरला. हे मुसलमान एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्यासाठी आग्रह केला. तेथील सुरक्षारक्षकांनी या मुसलमानांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी श्री त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राह्मण महासंघ नाशिक यांनी तीव्र विरोध केला असून संबंधितांवर कारवाई होण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

कठोर कायदेशीर कारवाई करावी ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनीही या प्रकरणी नाशिक पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. ‘श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घटनेप्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मातील व्यक्तींनाचा देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथील भगवान शिवाचे स्थान हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून ही घटना गंभीर आहे.

या प्रकारामुळे जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून अमरावती, संभाजीनगर, अकोला येथील घटना पहाता नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या संदर्भात झालेली घटना ही जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवणारी असून यातून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे मोठे षड्यंत्र असू शकते. त्यामुळे या संदर्भात राज्यात अन्य कुठेही बलपूर्वक असे प्रकार होत असतील, तर तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदू कधीतरी एखाद्या दर्ग्यामध्ये जाऊन हिंदूंच्या देवतांचे भजन-कीर्तन करण्याचे धाडस करू धजावतील का ? आणि असे धाडस करणार्‍यांचा शिरच्छेद करण्यात आला, तर आश्चर्य वाटू नये !
  • हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !