नवी देहली – ब्रिटनमधील अनेक वस्तूसंग्रहालयामध्ये कोहिनूर हिर्यासह अनेक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्या भारताला परत मिळाव्यात, यासाठी वारंवार ब्रिटनकडे मागणीही केली आहे. यांतील काही वस्तू परत भारताला देण्यात आल्या आहेत. आता कोहिनूर आणि अन्य मूर्ती परत मिळण्यासाठी ब्रिटनशी चर्चा चालू करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून ‘प्रत्यार्पण अभियान’ चालवण्यात आले आहे. भारतीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले की, या वस्तू भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. या वस्तू आणि मूर्ती आणणे हे भारताच्या धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.