बेळगाव – कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यावर योगेश गौडा यांच्या हत्येचा आरोप असून त्यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. काँग्रेसने विनय कुलकर्णी यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. एक दिवसही मतदारसंघात प्रचारासाठी न जाता त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते यांनी केलेल्या प्रचारामुळे विनय कुलकर्णी यांचा विजय झाला आहे. विनय कुलकर्णी यांना ८९ सहस्र ३३३ मते पडली, तर भाजपचे पराभूत उमेदवार अमृत देसाई यांना ७१ सहस्र २९६ मते मिळाली.
संपादकीय भूमिकाहत्येचा आरोप असणार्या उमेदवाराला निवडणूक लढवू देणारी व्यवस्था काय कामाची ? निवडून आलेल्या अशा उमेदवारांकडून सुराज्याची काय अपेक्षा ठेवणार ? |