संयुक्त राष्ट्रांनी दर्शवला होता विरोध !
सिंगापूर – गांजा या अमली पदार्थाची तस्करी करण्यात दोषी आढळलेल्या भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला २६ एप्रिल या दिवशी फाशी देण्यात आली. तंगराजू सुपैया असे या व्यक्तीचे नाव असून तो सिंगापूरचा नागरिक होता. ‘रॉयटर्स’नुसार ४६ वर्षीय सुपैया याने वर्ष २०१३ मध्ये १ किलो गांजाच्या तस्करीस प्रोत्साहन दिले होते.
46 साल के तंगराजू सुपैया को 2013 में एक किलो से अधिक गांजे की तस्करी के आरोप में गिरफ्तार किया गया था. फांसी दिए से एक दिन पहले राष्ट्रपति द्वारा क्षमादान की याचिकाओं को खारिज करने के बाद सुपैया को फांसी पर लटका दिया गया.https://t.co/5KJ1SbhGdE
— DW Hindi (@dw_hindi) April 26, 2023
१. सिंगापूरमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात अत्यंत कठोर नियम आहेत. ‘जनतेच्या रक्षणासाठी मृत्यूदंड देणे, हे अत्यावश्यक आहे’, असे तेथील सरकारचे म्हणणे आहे.
२. सुपैया याच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेसमवेत अन्यही अनेक मानवाधिकार संघटनांनी विरोध दर्शवला होता. संयुक्त राष्ट्रांनी दावा केला होता की, अमली पदार्थांच्या प्रकरणी मृत्यूदंड देणे आंतरराष्ट्रीय मापदंडाच्या अनुरूप नाही.
३. सिंगापूरमध्ये गेल्या वर्षी अमली पदार्थांच्या प्रकरणांवरून ११ लोकांना मृत्यूदंड देण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची तस्करी करणार्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा ! |