निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८६
‘लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते. यामुळे जेवण न्यून होते. त्यामुळे ‘मित जेवण’ हा भाग साध्य करण्यासाठी निसर्ग अनुकूल असतो. या संधीचा लाभ करून घेऊन जेवणावर संयम ठेवावा आणि व्यायामात सातत्य ठेवावे. यामुळे लठ्ठपणा न्यून होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |