कोंढव्‍यातील (पुणे) शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्‍याचे पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण !

कोंढव्‍यातील ब्‍ल्‍यू बेल्‍स शाळेची इमारत (संग्रहित चित्र)

पुणे – राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) कोंढव्‍यातील ब्‍ल्‍यू बेल्‍स शाळेच्‍या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्‍या शाळेच्‍या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्‍या पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाच्‍या कह्यात असल्‍याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्‍यात आले आहेत. त्‍यादृष्‍टीने अन्‍वेषण चालू असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली होती. संबंधित शाळा के.झेड्. इमारतीत आहे. कोंढव्‍यातील के.झेड्. इमारत ‘ब्‍ल्‍यू बेल्‍स’ शाळेची इमारत म्‍हणून ओळखली जाते. पोलीस किंवा एन्.आय.ए.कडून शाळेची चौकशी करण्‍यात आली नाही, तसेच शाळेच्‍या खोल्‍या किंवा कार्यालयही ‘सील’ करण्‍यात आले नाही, असे पुणे पोलीस आणि एन्.आय.ए. यांनी कळवले आहे.