सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘देवतांची छायाचित्रे निर्गुण झाल्यावर त्यांचे विसर्जन करा’, असे सांगितल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे यांना शिकायला मिळालेले सूत्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. प्रकाश मराठे यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देवतांची छायाचित्रे निर्गुण झाल्यावर पुढे त्यांचे काय करायचे ?’, असे विचारणे : ‘काही दिवसांपूर्वी माझी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाली होती. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘आश्रमाच्या ध्यानमंदिरातील सर्व देवतांची छायाचित्रे पूर्णपणे निर्गुण झाली आहेत. ‘छायाचित्रे सगुणातून निर्गुणात जातात’, हे आपल्याला ठाऊक आहे; पण त्यापुढे त्यांचे काय करायचे ?’’ तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सहजपणे म्हणाले, ‘‘पुढे त्यांचे विसर्जन करायचे.’’

श्री. प्रकाश मराठे

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उत्तर ऐकून ‘प्रत्येकाला उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांतून जावेच लागते’, हे शिकता येणे : प्रत्येक वस्तू किंवा जीव यांना ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांतून जावेच लागते. सनातन संस्थेने देवतांची चित्रे निर्माण केली, नंतर ती निर्गुण झाली. चित्रे निर्गुणात गेल्याने त्यांतील सजीवता गेल्याने ती विसर्जन करायची. यातून मला शिकायला मिळाले की, ‘आपण जन्मलो, शिकलो आणि साधनेसाठी येथे आश्रमात राहिलो. आता पुढे आपल्यालाही हे सर्व सोडून जायचे आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तरामुळे मला पुढची दिशा समजली आणि आनंद झाला.

मला वरील सूत्र शिकायला मिळाले, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२६.११.२०२२)