लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये रहाणारी भारतीय वंशाची एक महिला संबलपुरी साडी परिधान करून मॅरेथॉन स्पर्धेत धावत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. मधुस्मिता जेना दास असे या महिलेचे नाव असून तिने १६ एप्रिल या दिवशी मँचेस्टरमध्ये ४२.५ किमीची ‘मँचेस्टर मॅरेथॉन’ स्पर्धा ४ घंटे ५० मिनिटांत पूर्ण केली. ही युनायटेड किंगडममधील दुसरी सर्वांत मोठी मॅरेथॉन स्पर्धा आहे.
मैनचेस्टर मैराथन में संबलपुर साड़ी पहनकर दौड़ी भारतवंशी महिला, पूरी की 42.5 किमी की दौड़ https://t.co/LSyTM7EWBM #MANCHESTER #sambalpur #marathon #MadhusmitaJena pic.twitter.com/T6XpW9qO4E
— IND24 (@IND24AMPL) April 19, 2023
१. साडी परिधान केलेल्या ४१ वर्षीय मधुस्मिता यांचा शर्यतीत धावतांनाचा व्हिडिओ ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल यूके’ या संघटनेने ट्वीट केला आहे.
२. मधुस्मिता यांनी जगभरात अनेक ‘मॅरेथॉन’ आणि ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी घेतला आहे.
३. मधुस्मिता यांच्या व्हिडिओवर एका व्यक्तीने ‘आपण आपली संस्कृती अशा प्रकारे जगाला दाखवली पाहिजे. जे परदेशी पोशाख परिधान करू इच्छितात, त्यांनी कृपया मधुस्मिता यांच्याकडून शिकावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.