गोमयाने गाडीच्या आतील वातावरण थंड रहाण्याच्या दाव्याला वाहन तज्ञांनीही दिला दुजोरा !
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील सागर जिल्ह्यात असलेल्या तिलकगंज येथील ‘जरुआखेडा आरोग्यं सेतू’ या आरोग्य केंद्रातील होमिओपॅथी डॉक्टर सुशील हे त्यांच्या ‘मारूती ऑल्टो’ या चारचाकी वाहनातून पुष्कळ प्रवास करतात. सध्या त्या क्षेत्रात ४१ अंश तापमान आहे. अंगाची लाही लाही होणार्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डॉ. सुशील यांनी त्यांच्या गाडीवर गोमयचा (शेणाचा) लेप लावला आहे. यामुळे गाडीचे आतील तापमान थंड रहाते, असे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. सुशील यांनी यासंदर्भात सांगितले की, यामुळे सूर्याची किरणे थेट वाहनावर पडत नाहीत. वाहनावरील शेणाचा लेप ती किरणे शोषून घेतात. तसेच गोमयामुळे वाहनाचीही काही हानी होत नाही. वाहन तज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. वाहनाच्या बाहेर शेण लावल्याने आत उष्णता जात नाही. यामुळे वाहन आतून थंड रहाते, असे तज्ञांचेही म्हणणे आहे.