ब्रिटीश सांसद आणि अर्थतज्ञ स्टर्न यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे )

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर विकासाचे असे ‘मॉडेल’ सादर केले आहे, जे जगाला अतिशय आवश्यक आहे. विकास आणि वृद्धी यांविषयी एक नवा अध्याय भारताने जगासमोर ठेवला आहे, असे वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ आणि ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न यांनी म्हटले आहे.

सौजन्य : ANI News

विकासाच्या संदर्भात मोदी यांचे विचार सुस्पष्ट आहेत. ‘जी २०’चे नेतृत्व करतांनाही ते दिसून येतात. जलवायू परिवर्तनाच्या संदर्भात भारताने एक ‘मॉडेल’ सादर केले होते. त्या मॉडेलविषयी स्टर्न यांनी स्तुती केली. या ‘मॉडेल’नुसार जागतिक स्तरावर कृती केल्यास लोक प्रदूषित वायूमुळे मृत्यूमुखी पडणार नाहीत.