अमेरिकेतील मशिदीत मुसलमान युवकाने इमामाला भोसकले !

इस्लामचा अपमान केल्याचा आरोप

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख)

डावीकडे आरोपी सेरिफ जोरबा

न्यूजर्सी – शहरातील पॅटरसन येथे रमझानच्या निमित्ताने ओमर मशिदीत नमाज चालू असतांना सेरिफ जोरबा या मुसलमान युवकाने इमाम सैय्यद एल्नाकिब यांना चाकूने भोसकले. हा युवक मूळ तुर्की वंशाचा आहे. या वेळी त्याने ‘इमाम सैय्यद एल्नाकिब इस्लामच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असल्यामुळे मी हे कृत्य केले. मला इमामाच्या घरात घुसून त्याला मारायचे होते. त्याने इस्लामचा अपमान केला आहे’, असा आरोप केला.

या आक्रमणाच्या वेळी मशिदीत २०० लोक नमाजपठण करत होते. लोकांनी जोरबा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एल्नाकिब यांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ओमर मशीद ज्या परिसरात आहे, त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती आहे. या घटनेनंतर स्थानिक नेते अब्देल अझीझ यांनी चिंता व्यक्त करत ‘मुसलमानांनी संघटित होऊन एकत्र यावे’, असे आवाहन केले आहे.