लेह (लद्दाख) – येथे एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या ५२ वर्षीय सैय्यद जुल्फिकार अली शाह याला पोलिसांनी अटक केली आहे. २९ मार्च या दिवशी पीडिता शाळेत एकटी जात असल्याचे पाहून जुल्फिकारने तिला ‘माझ्या गाडीतून शाळेत सोडतो’, असे सांगितले. ती गाडीत बसली असता त्याने तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिला पुष्कळ मारहाणही केली. ती मृत झाल्याचे समजून तो फरार झाला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी पीडितेला रुग्णालयात भरती केले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी सैय्यद जुल्फिकार याला ४८ घंट्यांच्या आत अटक केली. त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासरकारने अशा वासनांधांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा दिल्यासच अशा घटना थांबतील, हे लक्षात घ्या ! |