नागपूर येथील ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्‍या अध्‍यक्षांसह तिघांवर गुन्‍हा नोंद !

नागपूर – ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्‍या (‘एन्.व्‍ही.सी.’च्‍या) १७ डिसेंबर २०२२ या दिवशी येथे आयोजित आमसभेत शिवीगाळ करून धमकावण्‍याच्‍या आरोपाखाली संघटनेचे अध्‍यक्ष अश्‍विन मेहाडिया यांच्‍यासह ३ पदाधिकार्‍यांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. माजी अध्‍यक्ष दीपेन अग्रवाल यांच्‍या तक्रारीवरून हा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

गुन्‍हा नोंद झालेल्‍यांमध्‍ये राजवंत तुली (गोल्‍डी), आनंद अग्रवाल, तसेच महेशकुमार कुकरेजा यांचाही समावेश आहे. विद्यमान कार्यकारिणी दुसर्‍यांदा निवडून आल्‍यावर ‘एन्.सी.एल्.टी.’ने ‘एन्.व्‍ही.सी.सी.’ची कार्यकारिणी विसर्जित करत प्रशासक नियुक्‍तीचा आदेश दिला आहे. त्‍यातून दीपेन अग्रवाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे ध्‍वनीमुद्रण करता यावे; म्‍हणून मुकेश सगलानी आणि त्‍यांच्‍या चमूला बोलावले. ध्‍वनीमुद्रण चालू झाल्‍यावर अश्‍विन मेहाडिया यांनी शिवीगाळ करून धमकावले आणि ध्‍वनीमुद्रण बंद पाडले.