डॉ. नीलम गोर्हे यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी
नाशिक – महाराष्ट्रात विविध भागांत घडलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी नोंद घेतली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस महासंचालकांना लेखी निवेदन दिले असून ‘या सर्व घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी सूचना त्यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एका विधवा महिलेला पतीच्या मृत्यूसंदर्भात माहिती विचारल्याने इतर महिलांनी तिला चपलांचा हार घालून गावात धिंड काढली. ‘महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का देणार्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा’, अशी सूचना डॉ. गोर्हे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी भागातील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून केलेला विनयभंगाचा प्रकार अतिशय गंभीर आहे. या शिक्षकावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी करण्याची वेळच का येते ? पोलीस प्रशासन स्वतःहून त्यांचे कर्तव्य म्हणून कारवाई का करत नाही ? |