जामताडा (झारखंड) येथे मुसलमानबहुल भागात श्री सरस्वती देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !

  • २ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !

  • आक्रमण पूर्वनियोजित !

घटनास्थळ

जामताडा (झारखंड) – येथील डोकीडीह गावामध्ये २७ जानेवारीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी मुसलमानांनी केलेल्या गोळीबारात २ पोलीस आणि अन्य काही हिंदू घायाळ झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना ही घटना घडली.

सौजन्य: News18 Bihar Jharkhand

मोठ्या संगीत यंत्रणेसह मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना दगडफेक झाल्यावर हिंदूंनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावल्यावर हिंदूंनी संगीत न लावता मिरवणूक नेण्याचे मान्य केले; मात्र तरीही मुसलमानांनी पुन्हा अचानक आक्रमण केले. त्यांनी घराच्या छतांवरून दगडफेक केली. हे सुनियोजित आक्रमण होते. छतावर आधीपासूनच दगड जमा करून ठेवण्यात आले होते. दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

संपादकीय भूमिका

देशात कधीही अन्य धर्मियांच्या मिरवणुकांवर आक्रमणे होत नाहीत; मात्र मुसलमानबहुल भागांत प्रत्येक वेळी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे होतात, हे आतापर्यंत कायमचे न रोखता येणे हिंदूंना लज्जास्पद !