नागपूर येथे पैशांचा पाऊस पाडण्‍याच्‍या नावाखाली अल्‍पवयीन मेहुणीवर अत्‍याचार !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – जिल्‍ह्यातील नरखेड येथे पैशांचा पाऊस पाडण्‍याचे आमीष दाखवून स्‍वतःच्‍या मेहुणीवर नराधमाने सतत ८ मास बलात्‍कार केला. यात पीडित अल्‍पवयीन मुलीच्‍या बहिणीनेही साहाय्‍य केले. पीडित मुलीची बहीण आणि तिचा पती यांनी हा अत्‍याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्‍कारासह विविध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद करून दांपत्‍याला अटक केली आहे. सततच्‍या अत्‍याचारामुळे अल्‍पवयीन मुलीची प्रकृती खालावल्‍यानंतर तिने याची माहिती नातेवाइकांना दिली.

संपादकीय भूमिका

नैतिकतेला काळीमा फासणारी घटना !